Monday, December 19, 2011

प्रेम भावे जीव जगी या- अर्थात संगीत मानापमान..

बरयाच दिवसांनी रविवारची संध्याकाळ अगदी हवी तशी, कल्पनेतली घालवता आली..
स्थळ: यशवंतराव चव्हाण नाट्यगृह.
नाटक: (पुन्हा नव्याने, नव्या संचात) संगीत मानापमान..
माझे सासूसासरे काही दिवस आमच्याकडे राहायला आले आहेत. आमच्या घरात सर्वच संगीतातील दर्दी! (अर्थात माझा अपवाद वगळता..) त्यामुळे मानापमान पुन्हा रंगभूमीवर आले आहे, आणि त्याचे पुण्यात चारच प्रयोग होणार आहेत, हे कळल्यावर माझ्या सासऱ्यांनी लगेच त्याची पाच तिकिटे काढून आणली सुद्धा! (कालचा प्रयोग आमच्यासाठीही एका गोष्टीचा शुभारंभ करण्याचा होता - माझ्या अडीच वर्षाच्या पिल्लाला आम्ही पहिल्यांदा theatre मध्ये नेणार होतो. चांगली गोष्ट अशी, कि माझा मुलगा खूप लहानपणापासूनच नाट्यगीते, भावगीते, आणि अगदी मोझार्टच्या symphonies असे अनेक प्रकार अगदी तल्लीन होऊन ऐकतो. त्यामुळे तो कदाचित एकंदरीत नाटकाचे वातावरण, त्यातील पदे enjoy करेल असा आमचा होरा होता - जो सुदैवाने खरा ठरला.. :))
एखाद्या लग्नाला जाताना जशी तयारी करू ना आपण, तसा नट्टापट्टा (!) करून आम्ही सर्वजण वेळेच्या अर्धातास आधीच यशवंतराव ला पोहोचलो. (हो, पार्किंग चा problem नको..). शुभारंभाचा प्रयोग असल्यामुळे खरोखरच सनई-चौघडे, रांगोळी असे अगदी लग्नाचे वातावरण होते.. इतके छान वाटले म्हणून सांगू..!!
मूळ नाटकाच्या संहितेला धक्का न लावता, त्यातील पदांची लांबी थोडी कमी करून, राहुल देशपांडे, सायली पानसे आदी कंपूने, तीन तासांचा अगदी देखणा प्रयोग उभा केला आहे...
ज्यांनी मूळ मानापमान पहिले आहे, त्यांना हा प्रयोग कितीसा पटेल ते मला माहित नाही - पण माझ्या मते तरी अशी तुलना करून आपण, जे मनापासून एखादी जुनी गोष्ट पुन्हा तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचे श्रम हिरावून घेतो. तेंव्हा माझ्याकडून तरी या सर्व टीमला त्यांच्या अथक प्रयत्नांबद्दल मनापासून धन्यवाद...आणि खरे सांगू का, काही काही गोष्टी, विशेषतः. projector चा केलेला अफलातून वापर {खास करून भामिनी तयार होताना आरशात पाहत आहे तो प्रसंग..}, राहुल देशपांडे आणि सायली पानसे ची गायकी ह्या खरोखरच खूप खूप स्तुत्य आहेत..!!
आणखीन एक गोष्ट - हे नाटक म्हणजे अतिशय दर्जेदार नाट्यगीतांची खाणच आहे.. मी सकाळी office ला आले तरीही , तो hangover काही ओसरला नव्हता! खास करून, 'प्रेम भावे जीव जगी या' हे नाट्यगीत ऐकावेसे वाटले (कारण इतर बरीच नाट्यगीते सहज available आहेत महाजालावर..). मग काय, search केले, आणि खाली दिलेल्या लिंक वर खजिनाच मिळाला. आपणही जरूर भेट द्या -

http://gaana.com/#/streamalbums/Manapman_Drama_२२८१८



Sunday, December 18, 2011

राष्ट्र आपले; प्रगती आपली; पण जबाबदारी? ती कोणाची?

मला माहित आहे, की हा विषय अगदी चावून चोथा झालेला आहे. पण तरीही, जेंव्हा कोणी, 'अरे भाई, इस देश का क्या होगा?' असे म्हणून गळा काढते तेंव्हा अगदी राहवत नाही. शेवटी देश, देश म्हणजे तरी कोण हो? तुम्ही आम्हीच ना? मग? शेवटी आपण नेऊ त्याच दिशेला जाईल नं देश आपला?
माझा नवरा यासंदर्भात एक खूप साधे पण पटणारे व्याक्य बोलतो नेहमी. त्याच्या मते, आपण कोणीच देशासाठी काही केले नाही तरी चालेल एकवेळ, पण स्वतःची कामे प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने करावीत. तरीही खूप गोष्टी सोप्या होतील. 
म्हणजे बघा हं, आपण सगळे कोणत्याही गोष्टीसाठी आजूबाजूच्या परिस्थितीलाच कायम दावणीला बांधत असतो. पण या सगळ्यामध्ये आपणही परिस्थितीचाच एक अविभाज्य घटक आहोत हे सोयीस्करपणे विसरतो. पेट्रोलचे भाव वाढले, करा संप! वाढती महागाई - करा आंदोलने! आपल्या श्रद्धास्थानाचा अपमान झाला - काढा मोर्चे! करा जाळपोळ! नाही नं पडले दान आपल्या मनासारखे - मग उधळून टाका सगळा डाव... नं  रहेगा बांस, नं बजेगी बासुरी..!!!
खरच इतके कठीण आहे का जबाबदारीने वागणे? मला तर ठामपणे असे वाटते की येत्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला बाकी कुठलेही (पूर्ण न होणारे) संकल्प सोडले नाही तरी चालतील पण स्वतापुरते काही नियम बनवायला काय हरकत आहे? जसे की -
१) मी कोणालाही दिलेली वेळ व दिलेला शब्द पाळेन.
२) मी माझ्या घरातील शक्य तितक्या कामात मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन.
३) मी कचरा नेहेमी कचरापेटीतच टाकेन. (आजूबाजूला कचरापेटी नसली, तर छोट्या छोट्या गोष्टी, जसे की chocolate चे wrapper  माझ्याजवळ ठेवेन, व घरच्या कचरापेटीत टाकेन.)
४) मी मला नेमून दिलेले काम मन लावून करेन, व त्यामध्ये सुधारणा कशा करता येतील याच्यासाठी सतत प्रयत्नशील राहीन.
५) मी रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी  थुंकणार नाही.
६) मी वाहतुकीच्या नियमांचे पालन करीन.
७) मी मला नेमून दिलेले काम करण्यासाठी कुठल्याही प्रकारची लाच स्वीकारणार नाही, अथवा तशी अपेक्षाही करणार नाही.
८) मी लहान मुले, जेष्ठ नागरिक यांच्याशी प्रेमाने,सन्मानाने वागेन, व त्यांना शक्य तितकी मदत करेन.
९) मी एखादे मत व्यक्त करताना दुसऱ्याच्या भावनांचा जरूर विचार करीन. मी आजूबाजूच्या माणसांना न दुखावण्याचा शक्य तितका प्रयत्न करीन.
१०) माझ्या पैश्याबरोबरच माझा थोडासा वेळही माझ्या कुटुंबियांसाठी देईन.
ही यादी फक्त प्रातिनिधिक स्वरूपाची आहे. यात अजून कितीतरी गोष्टींची भर टाकता येईल. आपल्याकडे आहेत अशा काही छोट्या छोट्या कल्पना, ज्यामुळे आपला समाज अधिक सुंदर, अधिक मोकळा होईल आणि प्रगतीपथाकडे जाईल?






Friday, December 16, 2011

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार...

वाचकहो,
लेखाचे शीर्षक वाचून 'आज हिला एकदम प्रवचन देण्याचा मूड आलेला दिसतोय' असा विचार करून घाबरून जाऊ नका हं ! खरे तर या शीर्षकाची philosophy ही श्री. वामनराव पै यांच्या जीवन विद्या मिशनच्या बोधवाक्याशी जुळणारी असली तरी त्यामागचा संदर्भ मात्र वेगळा आहे -
माझ्या सुदैवाने मला आयुष्यात नेहमीच चांगली माणसे भेटली. कितीतरी जणांकडून असंख्य गोष्टी शिकता आल्या. हे शिकणे अखंड सुरु आहे...
तर एकदा मी आणि माझा -friend, philosopher, and guide असा- समविचारी सुहृद, एका विषयावर चर्चा करत होतो - विषय होता एखादी गोष्ट मिळवण्यासाठी निर्मळ मनाने प्रयत्न करण्याबद्दल ! बोलता बोलता माझ्या मित्राने 'Death at a Funeral'  या गाजलेल्या चित्रपटातील एका पात्राच्या तोंडी असलेला परिच्छेद थोडेसे बदल करून सांगितला. तो मला इतका भावला, की तोच आज तुमच्यासमोर ठेवत आहे -

" We may not be perfect persons, but we are good people. So, may be, maybe there are somethings we would like to do. Life isn't simple. It's complicated. We're all just thrown in here together, in a world full of chaos, confusion, a world full of questions and no answers, death always lingering around the corner, and we do our best. But we can't do our best every time. We have to go for what we want in life because we never know, how long we're going to be here. And whether you succeed or fail, the most important thing is to have tried. And apparently, no one will guide you in the right direction. In the end, you have to learn for yourself, you have to grow up yourself.... "


म्हटले तर किती साधा सोपा विचार.. पण किती वेळा अमलात आणतो आपण तो? बरयाच वेळा अपयशाच्या भीतीने आपण एक पाऊलही पुढे टाकत नाही..  अरे भाई, क्यू डरते है हम नाकामयाबिसे? क्यू नही बताते हम अपने आपको के  हमने कोशिश तो की..
मुख्तसर सी बात ही सही.. लेकीन असार तो बहोत बडा है... !!
काय पटते ना? 




Thursday, December 15, 2011

Sometimes NOTHING is EVERYTHING...

वाचकहो,

काही दिवसांपूर्वी Julia Roberts चा Eat, Pray, Love हा चित्रपट टीव्हीवर पाहत होते. Julia च्या इतर अनेक चित्रपटांच्या मानाने हा तसा संथ गतीचा आणि वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे. कदाचित  म्हणूनच की काय, तो हळूहळू आतमध्ये मुरत जातो आणि मग आपण चित्रपटातील philosophy वर कधी विचार करायला लागतो हे आपले आपल्यालाही कळत नाही...
तर आयुष्याचा अर्थ शोधायला निघालेली एक मनातून अस्वस्थ अशी स्त्री.. तिला जगभर फिरताना काय काय अनुभव येतात आणि मग त्या अनुभवांचा एक घटक होताना ती आतून  कशी शांत, समाधानी  होत जाते याची ही कथा आहे. या प्रवासात एका टप्प्यावर ती इटलीला येऊन पोचते. तिथे काही दिवस व्यतीत करताना  तिला त्या लोकांच्या कायम तोंडावर असलेले एक वाक्य खूप भावते - "ll dolce far niente"  अर्थात "the sweetness of doing nothing" ....
चित्रपट चालू असताना हे वाक्य आले आणि त्याने मनाचा कब्जा घेतला. एका दृष्टीने हा तसा नवीन विचार होता. - "the SWEETNESS of doing NOTHING ?? "  काही न करण्यातील गोडवा, आनंद ?? - अरे, इतके दिवस तर आपण कृतीशील असण्याबाद्दलचे कितीतरी विचार ऐकले. 'आराम हराम आहे' हेच आपल्यावर सतत बिंबवले गेले आहे. मग हे काय वेगळेच बरे? मी हळूहळू अंतर्मुख होत होते ... आणि एका क्षणी मला जाणवले की आपण आतून शांत शांत झालो आहोत... एका कुहरात हरवलो आहोत, ज्याच्या पलीकडे प्रकाश आहे की नाही याचीही आपल्याला फिकीर नाही... आणि मग अचानक वरील वाक्याचा अर्थ गवसला.... समाधी, समाधी म्हणतात ती याहून वेगळी असेल का?
खरच, एरव्ही आपण अगदी एकटे असतानाही  किती गजबजाटात हरवलेलो असतो ना? कामवालीच्या दांड्या, मुलांची शाळेची घाई, बॉसच्या deadline ची आठवण करून देणाऱ्या मेल्स, traffic चा त्रास, सहकाऱ्यांच्या कटकटी, संप, बंद, रोजचा पेपर वाचूच नये असे फिलिंग देणाऱ्या आतील बातम्या, पेट्रोल चे अखंड वाढते दर... एक ना दोन, हजार कटकटी.. काही आपल्या आवाक्यातील, तर बरयाचश्या आपल्या कुवतीबाहेरच्या...तरीपण आपण त्यांच्यावर विचार करणे, वैतागणे थांबवत नाही.. आणि हा सगळा भार पडतो आपल्या मनावर... ते बिचारे निमुटपणे हा ताण सहन करत राहते... पण किती दिवस?
चला मग, आता आपल्या मनाला थोडी विश्रांती देऊ या का? असे करायचे, की घरातलाच एक कोपरा निवडायचा...अगदी कुठलाही... आणि तिथे सर्व शरीर सैलावून बसायचे... मग अलगद डोळे मिटायचे.. मनातील विचारांना, त्यांना हवे त्या दिशेला जाऊन द्यायचे.. पण आपण मध्ये लुडबुड करायची नाही हं.. आताचा वेळ हा फक्त आपल्या मनाचे ऐकायचा आहे... गम्मत म्हणजे, आपण घाईत असताना, कधी एकदा आपल्याला शांतपणा मिळेल याची वाट बघत असतो, पण जेंव्हा खरोखरच शांतपणे बसायची वेळ येते तेंव्हा ते वाटते तितके सोपे नाही हं... बरोबरच आहे, आपण कायम आपल्या मनाला मारून मुटकून एका कोपरयात बसवत असतो. आता आपण कोपरयात बसून मनाला हवे तसे बागडून द्यायचे म्हणजे काय? ...
पण या अवस्थेत काही वेळ गेल्यावर, खरच खूप खूप वेगळे वाटते.. थोड्या वेळाने आपण शांतपणे डोळे उघडतो तेंव्हा अगदी पुनर्जन्म झाल्यासारखे वाटते.. भिंतीवर पडलेला उन्हाचा कवडसाही वेगळे रूप घेऊन येतो आपल्यासाठी.. पानांची सळसळ, गच्चीतील कबुतरांचे मंद घुमणे, कुठेतरी दूर देवळात वाजणारी घंटा, स्वयंपाकघरात कढवल्या जाणारया लोण्याचा खरपूस वास, घरातील लहान मुलाचे खुदुखुदू हसणे, देवघरातील उदबत्तीचा मंद सुगंध, प्रेमाने रान्धलेल्या अन्नाची जिभेवर रेंगाळणारी चव या आणि अशा असंख्य गोष्टी आपल्या चेहेरयावर हसू उमटवतात.. कोंडलेला श्वास मोकळा होतो...आपण नव्याने सज्ज होतो... आयुष्याची लढाई लढण्यासाठी.. नव्हे, आयुष्य समरसून जगण्यासाठी....तेंव्हाच कुठेतरी जाणवते - खरच... Sometimes NOTHING is EVERYTHING....



Wednesday, December 14, 2011

रोपटे नात्यांचे - खुराक गप्पांचा..!!

वाचकहो,
आज माझा मानवी नातेसंबंधांबद्दल लिहायचा मूड आहे. 

आमच्या घरातील सर्वात चांगली गोष्ट काय असेल तर मी आणि माझे पतीदेव (!) खूप वेगवेगळ्या विषयांवर खूप छान गप्पा मारू शकतो. हो, अगदी तासनतास.. दोघांची कधीकधी अगदी जुळणारी मते, किंवा काही वेळा होणारे मतभेद... पण हे सर्व क्षण आम्हाला पुन्हा नव्याने जगायची उर्मी देतात. आम्ही दोघेही असा फक्कड गप्पांचा मूड लागण्याची वाट पाहत असतो जसे काही. Most beautiful thing about our relationship is that we almost never get bored in each other's company... आणि आम्हा दोघांना असे आवर्जून वाटते कि कोणतेही नाते टवटवीत, ताजे ठेवण्यासाठी सर्वात महत्वाचे असते ते त्या नात्यामध्ये असलेल्या व्यक्तींचे एकमेकांशी बोलणे.. मनापासून स्वतःला व्यक्त करणे.. आणि हे मी फक्त नवराबायको या नात्याविषयी म्हणत नाही आहे. कुठल्याही नात्याचे रोपटे जगवण्यासाठी त्याला खूप साऱ्या गप्पांचा खुराक मिळणे अति-आवश्यक आहे...

खेदाची गोष्ट अशी आहे, कि बहुतेक सर्वजण इथेच मार खातात. आपण सर्वजण खूप बोलतो, पण त्यातून भावना पोहोचवतो का? - खास करून चांगल्या भावना... आपण सर्व कानाने ऐकतो जरूर, पण ते आपल्या हृदयापर्यंत पोचते का? 

खरेतर या एका अर्थाने मुक्त समाजात, आपण खरोखरीच मनाने मुक्त आहोत का हा माझ्यासाठी एक प्रश्नच आहे. माझ्यामते तरी मोकळेपणा म्हणजे समोरच्याला आपल्या भावना, आपले विचार कोणताही आडपडदा न ठेवता सांगायचे स्वातंत्र्य ! आपली जवळची, जीवाभावाची नाती जपतानाच नवीन नाती निर्माण करायची, वेगळे विचार, वेगळे अनुभव यांना मोकळेपणाने सामोरे जायचे ही मानसिकता ! 

खर सांगू का तुम्हाला, आपण समोरच्या माणसाचा कुठल्याही लेबल शिवाय विचारच करत नाही.. आपल्यासाठी हा काळा असतो तर ती खूप आगाऊ असते. ही खूप कंजूस असते तर तो खडूस... किती बंद बंद करून ठेवत असतो न आपण आपली मने ...आणि एक स्त्री आणि एक पुरुष बोलत असले तर काय, बघायलाच नको. आपले मन घोड्यासारखे एकाच सरळ रेषेत विचार करत धावत असते.. आपल्या गावीही नसते, कि आपण आयुष्य सुंदर करण्याच्या कितीतरी संधी धुडकावून लावत असतो... अगदी सहजपणे...!!
हा लेख वाचता वाचता जरा आठवून पहा बरे- किती वेळा आपण जाणता अजाणता समोरच्याला अतिशय जिव्हारी लागेल असे बोललोय.. किती वेळा दुसऱ्यांचे सहानभूतीपूर्वक ऐकून घेतले आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे खूप खूप मनात असूनही केवळ न बोलल्यामुळे, अनेक सोनेरी क्षण तसेच फुकट घालवले आहेत...
तुम्ही म्हणाल की या दृष्टीकोनातून आपण अख्ख्या जगाशी वागायला लागलो तर आपले मन म्हणजे समोरच्यासाठी एक आरसाच होईल. आणि मग त्याची काच तडकायलाही फार वेळ लागणार नाही. कबूल ! शंभर टक्के बरोबर..!! आणि म्हणूनच तुम्ही सर्वांशी अशाच मोकळ्या मनोवृत्तीने वागा असा दुराग्रही सल्ला नाही द्यायचाय मला... अहो, पण आपल्या अतिशय जवळची माणसे, आणि -आपण ज्यांच्या आयुष्यात खूप महत्वाचे आहोत, अशी काही अनाम नाती- यांच्या बाबतीत तरी पाळता येईल की नाही हे पथ्य? आणि पथ्य कुठले - तर नात्यामधील कुठलेही गैरसमज हे एकमेकांशी शांतपणे बोलून संपवून टाकायचे आणि जर आपल्याला दुसरयाची कोणतीही (अगदी छोटीशी का होईना ) गोष्ट आवडलेली असली तर त्याची पोट भरून पोचपावती त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायची..मग पहा, त्या व्यक्तीच्या डोळ्यातील कृतज्ञतेची निरांजने तुम्हाला आयुष्यभराचा समाधानाचा प्रकाश देतील...
तुम्हाला मी माझ्याबाबतीतच घडलेली छोटीशी गोष्ट सांगते.. मला आवडलेले एखाद्या ओळखीच्या व्यक्तीमधील गुण हे त्या व्यक्तीला पत्ररूपाने सांगण्याची माझी सवय आहे.. (कदाचित लिहायला खूप आवडते त्याचा परिणाम असेल..) तर, झाले असे, की मी माझी आधीची नोकरी सोडून या नव्या नोकरीत रुजू होणार होते.. अर्थात ही नवीन नोकरी मी केवळ मला कार्यक्षेत्र बदलायचे होते म्हणून स्वीकारली होती. आधीच्या नोकरीतही माझ्या माणसांविषयी काहीच तक्रारी नव्हत्या. त्यातून माझे बॉस म्हणजे अगदी देवमाणूस होते. कंपनीत सर्वांनाच ते हवेहवेसे वाटत. तर अशा माणसापुढे मी जड अंतकरणाने माझा राजीनामा ठेवला. ते काही बोलले नाहीत, पण त्यांना वाईट वाटलेले त्यांच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होते. तो दिवसभर मी अतिशय उदास होते. शेवटी न राहवून मी माझ्या त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी लिहून काढल्या व दुसऱ्या दिवशी ते पत्र त्यांच्या हातात ठेवले. त्यामध्ये खूप छोट्याछोट्या अशा गोष्टी होत्या ज्यावेळी सरांनी आम्हाला खूप समजून घेतले होते. माझ्या कुटुंबियांचा सरांप्रती असलेला आदर पण त्या पत्रात व्यक्त झाला होता. सरांनी ते पत्र मनापासून वाचले. त्यावेळी त्यांच्या चेहेऱ्यावर पसरलेला निर्व्याज आनंद मी कधीही विसरू शकणार नाही...
बरोबर एका आठवड्याने आमचे लाडके सर आम्हा सर्वाना सोडून देवाघरी निघून गेले....
त्यांच्या अचेतन शरीराकडे पाहून रडताना, मनात कुठेतरी समाधान होते - या माणसाच्या चेहेऱ्यावर खरे हसू आणण्यात आपलाही खारीचा वाटा होता याचे...!!
असो, थोडेसे विषयांतर झाले असेल कदाचित, पण जाणवतेय ना आपल्याला, मला काय सांगायचे आहे ते - आयुष्य कुणाचाही द्वेष करण्यासाठी खूप लहान आहे... आणि शेवटी आपण जपलेली नाती, हेच तर आपले आयुष्य आहे, नाही का? 
तेंव्हा Pink Floyd गाण्यात म्हणतो तसे - KEEP TALKING !!










Friday, December 9, 2011

कधीतरी कुठेतरी छानसे वाचलेले...2



ऑस्कर वाईल्ड हा एकोणिसाव्या शतकातला एक महान लेखक व तत्ववेत्ता. त्याच्या थोडयाश्या उपहासपूर्ण तरीही चुरचुरीत शैलीची आजही अनेकांना भुरळ पडते. त्याचीच काही प्रसिद्ध quotes खाली वानगीदाखल देत आहे -

1) I am so clever that sometimes I don't understand a single word of what I am saying.
2) I can resist everything except temptation.
3) I have nothing to declare except my genuis.
4) I have the simplest tastes. I am always satisfied with the best.
5) I think that God, in creating man, somewhat overestimated his ability.
6) If you are not too long, I will wait here for you all my life.
7) It is a very sad thing that nowadays there is so little useless information.
8) It is absurd to divide people into good and bad. People are either charming or tedious.
9) A gentleman is one who never hurts anyone's feelings unintentionally.
10) A man's face is his autobiography. A woman's face is her work of fiction.
11)Morality is simply the attitude we adopt towards people whom we personally dislike.
12) No man is rich enough to buy back his past.
13) As long as a woman can look ten years younger than her own daughter, she is perfectly satisfied.
14) The old believe everything, the middle-aged suspect everything, the young know everything.
15) I have met a lot of hard-boiled eggs in my time, but you're twenty minutes.


वरील सर्व वाक्ये ही केवळ नमुन्यादाखल, उत्सुकता जागृत करण्यासाठी दिलेली आहेत. मला आवडलेली यादी वरील यादीपेक्षा किमान वीस पटीने मोठी आहे.


ऑस्कर वाईल्डविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी आपण खालीलपैकी दुवे वापरू शकता -
1) http://www.brainyquote.com/quotes/authors/o/oscar_wilde_8.html
2) http://thinkexist.com/quotations/funny/
3) http://en.wikipedia.org/wiki/Oscar_Wilde
4) http://www.online-literature.com/wilde/
5) http://cmgww.com/historic/wilde/
6) http://www.oscarwildecollection.com/
7) http://www.goodreads.com/author/quotes/3565.Oscar_Wilde
8) http://www.oscarwilde.com/welcome.html
9) http://www.wilde-online.info/
10) http://www.oscarwildesociety.co.uk/














Wednesday, December 7, 2011

कधीतरी कुठेतरी छानसे वाचलेले...

वाचकहो, 

आता पुढील काही भागांमधून मी, मला भावलेले, पटलेले असे मायाजालावरील लिखाण आपल्याशी शेअर करणार आहे. मग तो एखादा लेख असेल, किंवा एखादी छानशी कविता! काहीवेळा कुणा थोर शास्त्रज्ञ, लेखक, राजकारणी, संत अशा कुणाचीही मते येतील ! इथे काहीही वर्ज्य नाही. अर्थात लेखाबरोबर योग्य ती लिंक जोडली जाईलच. म्हणजे कुणाला त्या विषयावरील अधिक माहिती हवी असेल तर ती व्यक्ती त्या लिंक चा वापर करू शकेल.. 
माझ्या बाजूने म्हणाल तर, वेगवेगळे विषय मनसोक्त हाताळण्यासाठी मी माझ्या बाजूने फक्त एक सुरुवात करीत आहे. आपल्या अभिप्राय, प्रतिक्रिया आणि टीकेचे स्वागत आहे...

तर आजचे मत हे थेट धर्मावर भाष्य करणारे! पॉल डीराक नावाचा अतिशय बुद्धिमान, नोबेल पदक विजेता  पण तितकाच अबोल असा थोर भौतिक शास्त्रज्ञ होऊन गेला. त्याने धर्मावर काय परखड, पण अतिशय पटणारे असे भाष्य केले आहे ते त्याच्याच शब्दात - 

“I cannot understand why we idle discussing religion. If we are honest—and scientists have to be—we must admit that religion is a jumble of false assertions, with no basis in reality. The very idea of God is a product of the human imagination. It is quite understandable why primitive people, who were so much more exposed to the overpowering forces of nature than we are today, should have personified these forces in fear and trembling. But nowadays, when we understand so many natural processes, we have no need for such solutions. I can't for the life of me see how the postulate of an Almighty God helps us in any way. What I do see is that this assumption leads to such unproductive questions as why God allows so much misery and injustice, the exploitation of the poor by the rich and all the other horrors He might have prevented. If religion is still being taught, it is by no means because its ideas still convince us, but simply because some of us want to keep the lower classes quiet. Quiet people are much easier to govern than clamorous and dissatisfied ones. They are also much easier to exploit. Religion is a kind of opium that allows a nation to lull itself into wishful dreams and so forget the injustices that are being perpetrated against the people. Hence the close alliance between those two great political forces, the State and the Church. Both need the illusion that a kindly God rewards—in heaven if not on earth—all those who have not risen up against injustice, who have done their duty quietly and uncomplainingly. That is precisely why the honest assertion that God is a mere product of the human imagination is branded as the worst of all mortal sins.”


वरील मत वाचले होते ते - 

या दुव्यावर. 
डीराक विषयी अधिक जाणून घ्यायचे असेल तर खाली दिलेल्या साईटना अवश्य भेट द्या. हा शास्त्रज्ञ माणूस म्हणूनही तितकाच थोर होता. 


पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...